शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रबोधनकारांचा प्रगल्भ वारसा असणारे एक नेतृत्व ! बाळासाहेब म्हणजे एक आगळा-वेगळा मनस्वीपणा !! शिवसेनाप्रमुख म्हणजे परिणामांची चिंता न करता ठाम पणे वर्तन करणारा ज्येष्ठ राजकीय नेता !!! बाळासाहेब म्हणजे जबर आक्रमकता ! दिलेल्या शब्दाला शंभर टक्के जागणारे नेतृत्व !! बाळासाहेब म्हणजे हिंदुत्वाचा एक श्वास, ज्वलंत हिंदुत्वाचा एक हुंकारच !!!.
ठाकरे कुळ त्यांची निर्मितिक्षमता आणि कलात्मक कौशल्य प्रसिध्द आहे. बाळासाहेब निर्दोष आहे हे उदाहरण. संपूर्ण जगाला तो पेटलेले लहान लाकूड वक्तृत्वपूर्ण भाषण करणारा, त्यांच्या लेखनाचा झपाटा दांडगा आहे माहीत आणि प्रतिभासंपन्न व्यंगचित्रकार.
फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनचे प्रबोधनाचे संस्कार, दिवसागणिक मनावर कोरली जाणारी स्वातंत्र्यलढय़ाची गाथा आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राची प्रखर चळवळ यांतून बाळासाहेबांची वैचारिक दिशा स्पष्ट होत गेली, आणि बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येऊ लागली.
१९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या संघटनेचा जन्म झाला, आणि बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र ‘शिवसेनाप्रमुख’ म्हणून ओळखू लागला.. महाराष्ट्र श्रीमंत आहे, पण मराठी माणूस गरीबच आहे, ही स्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेने मराठी माणसाच्या मनामनात जिवंत केली आणि मुंबई व महाराष्ट्रातील मराठी माणूस शिवसेनेच्या मागे उभा राहिला. स्थापनेनंतर चार महिन्यांतच, ऑक्टोबरमध्ये मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या पहिल्याच मेळाव्याला जवळपास पाच लाख लोकांची गर्दी झाली, तेव्हाच शिवसेनेच्या मान्यतेवर शिक्कामोर्तब झाले होते
१९८९ मध्ये बाळासाहेब एक मराठी दैनिक सुरू केले सामना पक्षाचे प्रमुख निर्णय या वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले.
१९९५ ते २००० हा काळ शिवसेना-भाजपसाठी सुवर्णकाळ ठरला. देशात आणि महाराष्ट्रातही सेना-भाजपच्या राजनीतीला जनतेचा अभूतपूर्व कौल मिळाला. महाराष्ट्रात युतीचा भगवा फडकला, आणि बाळासाहेब ठाकरे हे निर्विवाद नेते ठरले. युतीच्या सत्ताकाळात बाळासाहेबांच्या द्रष्टेपणाची अनेक उदाहरणे साकारून महाराष्ट्रात जिवंत झाली. दोन रुपयांत गरीबांना झुणकाभाकर देणे हे त्यांचे स्वप्न होते. युतीचे सरकार राज्यात आल्यावर ते साकारले. पुढे व्यवस्थापनातील ढिलाईमुळे ही योजना टिकाव धरू शकली नाही, पण एका क्रांतिकारी निर्णयाचे शिल्पकार म्हणून बाळासाहेबांचे नाव महाराष्ट्राच्या सत्तापटलावर कायमचे कोरले गेले. राज्यात मातोश्री वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडीवासीयांना मोफत घरे, मुंबईतील उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अशी अनेक स्वप्ने जपत महाराष्ट्राच्या सामाजिक व भौतिक विकासाचा ध्यास बाळासाहेबांनी घेतला होता. यापैकी अनेक योजना साकारल्या आणि द्रुतगती मार्ग, उड्डाणपूल अशा योजनांनी महाराष्ट्राच्या विकासाची नवी दालने खुली झाली.
सन २००२ मध्ये इस्लामी दहशतवादाचे भयंकर सावट मुंबईने अनुभवल्यानंतर हिंदू आत्मघातकी पथके स्थापन करण्याच्या त्यांच्या आदेशामुळे प्रचंड खळबळ माजली. राज्य सरकारने त्यांच्यावर खटला दाखल केला. मात्र, प्रत्येक मुस्लिम आपला शत्रू नाही, तर देशविरोधी मुस्लिम शत्रूच आहे, असे ठणकावून सांगत मुंबईतील दंगलींनंतर बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पुरस्कार आणखी प्रखर केला.