मनोगत
आयुष्यात पहिल्या पासुनच काहीतरी वेगळ करण्याची मनामध्ये जिद्ध होती. वयाच्या अकराव्या वर्षी शिक्षण घेत असताना परिस्थिती मुळे दौंड तालुक्यांतील केडगाव येथे नेवसे यांच्या चहाच्या टपरीवर कपबश्या धुण्याचे काम करत असताना, परिस्थितीशी दोन हात करण्याचे बाळकडू मिळाले. त्याची पहिली पायरी म्हणून तालुक्यांतील केडगाव, दापोडी, बोरी, वाखारी, वरवंड, पाटस, कुरकूंभ इ. विविध गावांमध्ये विहीरी खोदण्याच्या मशिन ( यारी ) वर काम केले. परिस्थिती काय असते हे लहान वयातच समजल्याने व संकटांना सामोरे जाण्याची कला अवगत झाल्याने इतरांच्या दुःखात सहभागी होण्याचा मनामध्ये निश्चय केला. त्यामुळे मनाशी एक खुण गाठ बांधुन दुस-याने तयार केलेल्या वाटेवरून न जाता स्वत:ची वेगळी वाट तयार करण्याच्या इराद्याने मुंबईची वाट धरली…..
मायानगरी मुंबई मध्ये पोहचल्यानंतर असंख्य अडचणींवर मात करत रिक्षा चालवण्याचा व्यवसाय केला. रिक्षा व्यवसाय करत असताना मुंबईत हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसेना हे वारे वाहत होते. या वा-यावर स्वार होण्याचे मनामध्ये ठाम करून शिवसेनेच्या मुंबा नगरीतील अंधेरी येथिल शाखेत जाऊ लागलो. त्या वेळी मा. रमेश लटके साहेब, मा. रविंद्र वायकर साहेब, मा. भाऊ कोरगावकर साहेब यांचे सानिध्यात आल्याने व शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना’ या चार अक्षरांशी जोडलो गेलो. त्यानंतर व्यवसायात प्रगती करत असताना हिंदू ह्रदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शांत बसू देत नव्हते.
‘अन्याय करायचा नाही व अन्याय सहन पण करायचा नाही’ या साहेबांच्या वाक्याने मनात विचारांचे काहूर माजायचे आणी मग मनात विचार येऊ लागले शिवसेना ही चार अक्षरे सामान्य मानसांचे जीवन प्रकाशमय करू शकतात. हा ठाम विश्वास घेऊन ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हा साहेबांनी दिलेला मंत्र व भगवा खांद्यावर घेऊन आई तुळजा भवानीच्या आशिर्वादाने व आपल्या सारख्या अन्यायाशी लढा देणा-यांच्या सोबतीने जन सामान्यांच्या हक्कासाठी लढा देण्यासाठी अहोरात्र तयार आहे.
फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे……….! जय महाराष्ट्र……!
आपलाच,
महेश ( दादा ) पासलकर
जिल्हाप्रमुख, शिवसेना, पुणे.